यवतमधील प्रकरण जाणून घ्या काय म्हणाले अजितदादा…..

Todays News Highlights | aajchya Tajya ghdamodi | marathi batmya | mharashtra Batmya 

आजच्या ताज्या  घडामोडी | मराठी बातम्या | महाराष्ट्र बातम्या | सरकारी बातम्या | राजकीय घडामोडी

Todays News Highlights : The latest news updates from Maharashtra as of  6th August of 2025 which includes all the major राजकीय घडामोडी .. 

Todays News Highlights
Picture Credit : Wikipedia
 अजित पवारांचे बोल :

काही दिवसापूर्वी यवत जी घटना घडलेली होती त्याच्यानंतर काही इथं प्रतिनिधींनी भाषणं केली परंतु हे सगळं झाल्यानंतर सगळं शांत होतं कुठेतरी मध्यप्रदेशमध्ये घटना घडली आणि ती घटना घडल्यावर त्यांनी मोबाईलला एक पोस्ट केली आणि त्याच्यातनं थोडीशी गडबड इथं झाली. परंतु मी यवतकरांना, दौंडकरांना, पुणेकरांना, महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की पूर्णपणे इथली परिस्थिती आटोक्यात पोलीस यंत्रणे आणलेली आहे. कोल्हापूरून स्वतः फुलारी आमचे वरिष्ठ अधिकारी आलेले आहेत. जिल्ह्याचे पोलीस प्रमुख पण इथं आहेत. कोल्हापूर रेंजचे पण प्रमुख इथं आहेत. त्याचबरोबर ऍडिशनल एसपी बाकीचे सगळे बंदोबस्त आहे. एक एसआरपी ची पण टीम इथं आहे आणि सगळं आता आटोक्यात आहे. आता मी काही सहकाऱ्यांना भेटलो ते म्हणले की दादा यवतमध्ये अशा प्रकारे कधीच घटना घडलेली नव्हती आम्ही सगळे एकोप्यानी जातीय सलोका ठेवून या परिसरामध्ये राहत आलेलो आहे आज बाजार असतो आठवडे बाजार परंतु आता आठवडे बाजार बंद झालेला आहे आणि मी इतरांना पण आव्हान करतो आमचा पोलीस बंदोबस्त व्यवस्थितपणे राहील अफवांच्यावर कृपा करून कोणी विश्वास ठेवू नका माझी आपल्याही इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया सगळ्या मीडियाला आव्हान आहे की या संदर्भामध्ये आपण पण वस्तुस्थिती दाखवणे तुमचं कर्तव्य तुमचं काम आहे तो तुमचा अधिकार आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना कुठेही आता इथं कुठे भीतीच असं वातावरण नाहीये आणि परिस्थिती पूर्णपणे पोलिसांच्या कंट्रोलमध्ये आहे. त्याकरता आपण सगळे मिळून एकमेकाला सहकार्य करूया. मी यवतकरांना पण सांगू इच्छितो की ज्यांनी कोणी पोस्ट टाकलेली आहे त्याचा तसा बघितलं तर इथल्या लोकांशी फार काही जवळचा संबंध आहे अशातला भाग नाहीये. तो मला वाटत नांदेडवरून आलेला आहे म्हणजे काही वर्षापूर्वी आणि तो त्यांचा त्याचा मला वाटत बिगारीच काम करतो गवंड्याच काम करतो पण कधी कधी त्याच्या पाठीमागच्याच काळामध्ये काही घटना घडल्यामुळे थोडं काहींनी त्याच्या संदर्भामध्ये अग्रेसिव्ह भूमिका घेतलेली दिसते आणि काही तोडफोड केलेली दिसते नुकसान केलेलं दिसतं त्याच्या संदर्भातले सगळ्या पंच पंचनामे आणि इतर गोष्टी होतील आणि आम्ही पूर्णपणे ह्या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. राज्याचे प्रमुख पण पुण्यामध्येच आहेत. उपप्रमुख शिंदे साहेब पण पुण्यामध्येच आहेत. मी पण पुण्यात होतो. अजून तिथे काही कार्यक्रम आज तर आपल्या अण्णाभाऊ साठेची जयंतीचे सगळीकडे मिरवणुका वगैरे निघालेले आहेत. जयंती उत्साहाने सगळेजण साजरी करतायत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेची. आणि त्याच्यामुळे अशा वातावरण असताना त्याला कुठेही आणखीन गालबोट आपल्याला लागून द्यायचं नाही जे काही शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे नेहमीच सर्वांना बरोबर घेऊन जाणारा जातीय सोलाख ठेवणारा ही महाराष्ट्राची परंपरा आहे ती यवतकारकरांची पण परंपरा आहे ती आपण टिकूया दोन दोन गाड्या इथ आतमध्ये आहेत त्याच्या काचा वगैरे फुटलेल्या आहेत इथं काही सहकारी राहतात त्यांच्याशी पण आम्ही चर्चा केली ते म्हणले 30 चा लोकांचा मॉब आलेला होता आणि त्याच्यातून काही घडलं पण ते म्हणले आम्ही सगळेजण सुरक्षित आहोत पोलीस नंतर आले पोलिसांनी सगळं कंट्रोल मध्ये आणलेल आहे आपण पण बघताय की पूर्णपणे गावामध्ये परिस्थिती अटोक्यामध्ये आणण्याचं काम आमच्या पोलीस यंत्रणेनी केलेला आहे आणि त्यामध्ये सगळं काही व्यवस्था व्यवस्थित होईल असा मला विश्वास आहे

सुरू होतं पासून हे सगळ सुरू होतं पोलिसांनी योग्य ती पावलं उचलली असं तुम्हाला वाट

 योग्य ती पावलं उचललेली होती काल पण भाषण दोघ काही आमदारांची झाली त्याच्यामध्ये पण कुठेही काही अडचणी येणार नाहीत अशा प्रकारची खबरदारी घेण्यात आलेली होती फक्त आज जे काही मोबाईलला मध्यप्रदेशमध्ये घडलेलं कुठलंतरी एक फोटो टाकून काही बातमी त्यान त्या दाखवण्याचा प्रयत्न केला किंवा ठेवण्याचा त्याच्या मोबाईलमध्ये प्रयत्न केला त्याच्यातून पुन्हा थोडासा उद्रेक झाला ही वस्तुस्थिती मी नाकारत नाही

>  त्याच्यामध्ये तो उद्रेक झाला पण लगेचच पोलीस यंत्रणेने ह्या सगळ्या गोष्टी आवाक्यात आणल्यात कंट्रोलमध्ये आणल्यात आणि आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात

 आता तुम्हाला सगळं माहिती 144 लागू केल अशा वेळेस आपण पोलीस यंत्रणा 144 कलम लागूच करते कारण प्रत्येकानी शांततेने राहण्याच्या करता कुठे ग्रुप होऊ नये आता तुम्ही पण 144 कलमाच हे तोडले 144 कलमात पाच जणच एकत्र राहावे लागतात त्याच्यापेक्षा जास्त राहिले तर त्याचा कलमाचा भंग होतो पण आता तुम्हाला कोण बोलणार काय करणार

> कुठल का परिस्थिती नियंत्रणात घाबरून जायचं काही कारण नाही मी पुन्हा सगळ्या जनतेला आव्हान करेल नागरिकांना आव्हान करील सर्व जाती धर्माच्या माझ्या सहकाऱ्यांना आव्हान करेल की आपण सगळ्यांनी जातीय सलोका ठेवा कुठल्याही अफवांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका सगळी पोलीस यंत्रणा अतिशय बारकाईने नजर ठेवून इथल्या सगळ्या परिस्थितीवर त्यांनी बंदोबस्त लावलेला आहे परिस्थिति आटोक्यात ठेवण्याच्या करता आणि यवतकरांनी पण त्याला प्रतिसाद दिला थांबायच नाही

> मी मागे पण सांगितलेल आहे एखाद्या व्यक्तीने एखाद वक्तव्य केलं म्हणजे काही पक्षाची ती भूमिका नसते मी 100 वेळा तुम्हाला सांगितलेले आहे या संदर्भामध्ये आमची भूमिका शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेशीच आहे सेक्युलर विचारधारेशीच आहे शेवटी सगळ्यांनी शांतपणे विचार करून त्याच्यातन आपल्याला ध्येय काय गाठायचं आपला देश पुढे गेला पाहिजे राज्य पुढे गेला पाहिजे परिसराचा विकास झाला पाहिजे कायदा सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे याकरता आमच महायुतीचा सरकार आणि आम्ही सगळेजण मुख्यमंत्र्यांच्या सहित आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत आणि त्या पद्धतीने आमचं काम

> भडकाऊ बोलतात त्यांच्यावर कारवाई केली जाते

> अरे बाबा एक मिनिट

> सगळे नेते त्या संदर्भामध्ये मध्ये आम्ही नोंद घेतलेली आहे.

>> तर परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे अस अजित पवार यांनी म्हटलेला आहे आणि पोलिसांनी आता सर्व परिस्थिती नियंत्रणात आणली असून अफवानवर कोणीही विश्वास ठेवू नये अस त्यांनी म्हटल

तुम्हाला राजकीय चर्चेच्या मुख्य मुद्द्यांची झलक आम्ही येथे  देतो आणि आमचे हे विधान विविध स्तरांवरील राजकीय परिस्थितीवर प्रकाश टाकतात , अजित पवार मुख्यमंत्री होणार का?” किंवा “काश्मीरमध्ये 370 नंतर काय बदललं ? हे sgl जाणून घेण्यासाठी आमच्याशी खाली दिलेल्या लिंकच्या आधारावर कनेक्टेड रहा :

Click here to Connect with us through Telegram Channel 

 

अजित पवार यांच्यावर संजय राऊत यांचं मोठं विधान : 

Todays News Highlights
Picture Credit : Instagram

राजकारणात सध्या घडत असलेल्या घटनांवर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुशरीफ यांनी अजित पवार यांचे समर्थन करत सांगितले की, अजित पवार मुख्यमंत्री झाले तर त्यात काही चुकीचं नाही. ते अनेक वेळा उपमुख्यमंत्री झाले असून, त्यांच्या अनुभवाला तोड नाही. त्यांच्या कार्याला आणि पुढील वाटचालीला त्यांनी शुभेच्छा दिल्या. मात्र, हसन मुशरीफ हे पूर्वी वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत आलेले आहेत, याची आठवण करून देण्यात आली.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतविरोधी टॅरिफ धोरणाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार काय पावले उचलते, याकडे लक्ष लागले आहे. 5 ऑगस्टला मोदी काहीतरी मोठी घोषणा करून ट्रम्पला उत्तर देतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

अनुच्छेद 370 हटवून सहा वर्षे झाली असली तरी, काश्मीरमध्ये फारसा बदल झालेला नाही. ना परकीय गुंतवणूक आली, ना रोजगारनिर्मिती झाली, ना हिंसाचार थांबला. जमीन खरेदी करणे आजही कठीण आहे. त्यामुळे 370 नंतर मोदी सरकारचे दावे अपयशी ठरल्याचं मत मांडण्यात आलं. काश्मीरला पुन्हा पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा, ही ठाम मागणी करण्यात आली आहे.

राज्यातील राजकारणात भाजपवर गंभीर आरोप करण्यात आले. विरोधी पक्षांचे कार्यकर्ते, विशेषतः शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दबाव टाकला जातो. विक्रम राठोड, किरण काळे, यांच्यासारख्या नेत्यांवर चुकीचे आरोप लावून त्यांना राजकीयदृष्ट्या अडचणीत आणलं जात आहे. हे सगळं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होत असल्याचा आरोप आहे.

माधुरी हत्ती संदर्भातील आंदोलनावर भाष्य करताना जनतेच्या भावना समजून घेणं आवश्यक असल्याचं सांगितलं, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगार तरुणांची व्यथा, याकडे दुर्लक्ष होतंय, हे अधोरेखित करण्यात आलं.

शेवटी, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं एकत्र येणं ही महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक घटना ठरणार आहे. त्यांच्या युतीमुळे मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, संभाजीनगर यांसारख्या महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास वाढलेला आहे आणि ही युती भाजपसाठी मोठं आव्हान ठरू शकते.

तुम्हाला राजकीय चर्चेच्या मुख्य मुद्द्यांची झलक आम्ही येथे  देतो आणि आमचे हे विधान विविध स्तरांवरील राजकीय परिस्थितीवर प्रकाश टाकतात , अजित पवार मुख्यमंत्री होणार का?” किंवा “काश्मीरमध्ये 370 नंतर काय बदललं ? हे sgl जाणून घेण्यासाठी आमच्याशी खाली दिलेल्या लिंकच्या आधारावर कनेक्टेड रहा :

Click here to Connect with us through Telegram Channel 

Todays News Highlights | aajchya Tajya ghdamodi | marathi batmya | mharashtra Batmya 

आजच्या ताज्या  घडामोडी | मराठी बातम्या | महाराष्ट्र बातम्या | सरकारी बातम्या | राजकीय घडामोडी