Todays News Highlights | aajchya Tajya ghdamodi | marathi batmya | mharashtra Batmya
आजच्या ताज्या घडामोडी | मराठी बातम्या | महाराष्ट्र बातम्या | सरकारी बातम्या
Todays News Highlights : The latest news updates from Maharashtra as of 4th August of 2025 which includes महायुती सरकार , वाहतूक कोंडी , मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना & Many More …
महायुती सरकार मधल्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात सापडले आहेत. बोर्डीकरांनी भर कार्यक्रमात एका ग्रामसेवकाला कानाखाली लगावली त्याचबरोबर त्याला सेवेतून बडतर्फ करण्याचा इशारा दिला. आमदार रोहित पवारांनी त्यांच्या अरेरावीचा व्हिडिओ पोस्ट केलाय त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना कारवाई करण्याची मागणी केली आहे. कार्यक्रमा करता कमी लोक आले म्हणून रागवण हे समजवण्यासारखं आहे मात्र त्याकरता अधिकाऱ्याला कानाखाली मरण्याची धमकी देणे हा केवळ त्या अधिकाऱ्यांचा नव्हे तर संपूर्ण मंत्रिमंडळाचा अपमान आहे चूक असेल
तर नक्कीच अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी मात्र अशी धमकी देणे योग्य नाही त्यामुळे मंत्री मेघना बोर्डीकर यांच्या कारवाई करण्यात यावी अशी रोहित पवारांनी मागणी केलेली आहे रोहित पवारांनी ट्वीट केलेल्या व्हिडिओ नंतर मेघना बोर्डीकर यांनी स्पष्टीकरण दिलं मी सर्वसामान्यांच्या हक्का करता बोलले मात्र सध्या रोहित पवारांना काही काम उरलेलं नाहीये त्यामुळे ते असे व्हिडिओ ट्वीट करत असतात असं म्हणत रोहित पवारांना टोला लगावला. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांच्या नव्या वक्तव्याने ते पुन्हा वादाच्या भोऱ्यात सापडले आहेत. कितीही रक्कम आपण
कितीही रक्कम मागा आपण लगेच मंजूर करू सरकारचा पैसा आहे आपल्या बापाचं काय जातय अस वादग्रस्त वक्तव्य शिरसाटांनी केलं मुंबईमध्ये योगेंद्र पवारांचा साखरपुडा या निमित्ताने पवार कुटुंबीय पुन्हा एकदा एकत्र आलेत यापूर्वी जय पवारांच्या साखरपुड्यात पवार कुटुंबीय एकत्र आलं होतं मंत्री शंभूराज देसाईंनी आपलं शासकीय निवासस्थान असलेल्या मेघदूत बंगल्यावर प्रवेश केला. तब्बल 55 वर्षांनंतर देसाई कुटुंब मेघदूतवर वास्तव्याला आहे यावेळी गृहप्रवेशा वेळी मंत्री शंभूराज देसाई आणि त्यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर झाल्याचं बघायला मिळालं मेघदूत बंगल्यावर
शंभूराज देसाई यांचा बालपण गेलं आजोबा स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर त्यांना मेगदूत बंगला मिळाला पनवेल मधील डान्सबार मनसैनिकांनी फोडला शेकापच्या मेळाव्यात भाषण करताना राज ठाकरेंनी रायगड जिल्ह्यातील डान्सबार विषयी भाष्य केला होता. रायगडमध्ये परप्रांतीयांचे सर्वाधिक अनधिकृत डान्सबार आहेत असा उल्लेख राज ठाकंनी केला होता. त्यानंतर अवघ्या 12 तासांमध्येच पनवेलमधील डान्सबार मनसे कार्यकर्त्यांनी फोडले. पनवेलमधील नाईट रायडर हा डान्सबार फोडण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या
घराला बॉम्ब न उडवून देण्याची धमकी देण्यात आली धमकीचा कॉल करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली याप्रकरणात प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोलापूरमध्ये गळती रोखण्याकरता काँग्रेस पक्षाकडून जिल्हा स्तरावर समिती स्थापन करण्यात येणार आहे या समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर केली जाणार आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषीमंत्री पदाचा पदा स्वीकारल्यावर त्यांच्या निवासस्थानी हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली भरणेना शुभेच्छा देत कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला.
मानखटाव मानखटाव या परिसराला संपूर्णत दुष्काळ मुक्त करणार असल्याचा संकल्प मंत्री जयकुमार गोरेनी केलाय तर संकल्प पूर्ण केल्याशिवाय 2029 ची निवडणूक लढणार नाही अस ते म्हणाले पुण्यामध्ये कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या निवासथानाच्या बाहेर ढोलताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला पुरोहित यांची मालेगाव बॉन्सपोट खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्याने रॅली काढण्यात येणारे स्वतः पुरोहित रॅलीत सहभागी होणार आहे धुळ्यातील साखरी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात वसलेलं चिवटी बारी हे ठिकाणी सध्या पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरतय.
घनदाट जंगलात गायका डोंगरावरून 250 फूट उंचीवरून कोसळणारा हा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतोय. रायगड जिल्ह्यातील आंबेघर धबधबा कोसळायला लागलाय. धबधबा पाहण्याकरता नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली सुटीचा दिवस असल्याने पर्यटनाला नागरिकांनी पसंती दिली आहे. पावसाळ्यात कोकणातील सौंदर्य अधिकच खुललय हिरवागार निसर्ग आणि दाटधुक्यांची सादर पसरल्याने सगळ्यांनीच निसर्गाची सगळ्यांना भुरळ पडली आहे श्रावण मास सुरू असताना अधूनमधून पडणाऱ्या श्रावणधारांनी वातावरण अल्हाददायक झालय बीडच्या सौताडा या ठिकाणी पावसाने दमदार
हजरी लावली यामुळे धबधबा कोसळायला लागला धबधबा पाहण्याकरता पर्यटक गर्दी करतायत गडचिरोलीच्या पेदूळवाही गावात रुग्णवाहिका न मिळाल्याने जखमी व्यक्तीला खाटेवरून नेण्याची वेळ आली तीन किलोमीटर पर्यंत पायपेट करावी लागणे रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं यामुळे तातडीने रस्त्यासह रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येते गडचिरोलीची बातमी पेदुळवाही गडचिरोली वांगणी परिसरातून जाणाऱ्या कर्जत पुणे महामार्गाला खड्ड्यांच ग्रहण लागलय जागोजागी खड्ड्यांचा साम्राज्य पसरल अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे खड्डेमय
रस्त्यामुळे वाहनचालक हैराण झालेत वसईमध्ये मुंबई अहमदाबाद महामार्गावर सतत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते त्यामुळे शाळकरी मुलांसह नागरिकांना नाहक त्रासाला सामोर जाव लागत तातळीने वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. पिंपरीमध्ये शेअर मार्केट मधून पाच ते 20 टक्के परतावा देण्याच्या आमिशातून महिलेची फसवणूक करण्यात आली 54 लाख6 हजार रुपयांची फसवणूक झाली या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. बातमी सांगली मधून सांगलीमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांना आंदोलन करण्यात येतय.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याची मागणी करण्यात आली आंदोलकांची दखल न घेतल्याने त्यांनी आक्रमक होत रास्ता रोको केला. मानवी मेंदूत प्लास्टिकचा शिरकाव झाल्याचं एका संशोधनातून समोर आलय. मानवी मेंदूत प्लास्टिकचा प्रवेश झाल्याने मेंदूशी संबंधित डिमेशिया अल्झायमर स्मृतिभंश यासारखे आजार होण्याचा धोका वाढल्याचा दावा करण्यात आलाय. चंद्रपूर महापालिका ए आणि आगाखान एजन्सी ऑफ फॉर हॅबिटेट इंडिया यांच्या तीन वर्षांमध्ये करार करण्यात आला वाढती उष्णता आणि पुराचा धोका कमी करण्याकरता
विविध उपायोजना राबवण्यात येणार आहेत. दरम्यान 200हून अधिक गरजू कुटुंबांच्या घरांना उष्णते विरोधात विशेष तंत्रज्ञान उपलब्ध करून दिलं जाणार आहे. यावल इथल्या बाजार समिती सभागृहामध्ये केळी लागवड आणि व्यवस्थापनाच्या कार्यशाळेच आयोजन करण्यात आलं यावेळी कार्यशाळेमध्ये कृषी तज्ञ आणि केळी उत्पादकांनी उपस्थिती दर्शवली पिकावर पडणारे विविध रोग आजार याबाबत उत्पादकांना आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. भंडारा जिल्ह्यातील साकोली इथल्या 100 वर्ष जुन्या असलेल्या मालगुजारी या तलाव दोन दिवसांपूर्वी फुटला त्यामुळे या
तलावातील तब्बल 550 लाखांच्या मासोळ्या ऐन मच्छीमारी हंगामामध्ये वाहून गेल्या तब्बल 176 कुटुंबावर आर्थिक संकट ओढावला आहे. चोपडा आगाराला आता नव्या ई बसेस मंजूर झालेल्या आहेत. धुळे मार्ग नाशिक आणि चोपडा आगाराला या बसेस मिळणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर चार्जिंग पॉईंटच कामही आगारात पूर्णत्वाकडे गेलय. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील कुरखेड आणि निंबी या गावात स्मशान भूमी नसल्याने गावात कुणाचा मृत्यू झाला तर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करायचे कुठे असा सवाल गावकरी विचारतायत. अंत्यविधी करता प्रेत घेऊन गावकऱ्यांना भटकंती करावी
लागते. येत्या 7 ऑगस्टला कुरेशी समाजाकडून सोलापुरात मुकम मोर्चा काढण्यात येणार आहे याकरता कुरेशी समाजाने बैठक घेतली गेल्या 15 दिवसांपासून राज्यभरात मशीची खरेदी विक्री त्याच मटण विक्री बंद करत कुरेशी समाजाने कामबंद आंदोलन पुकारला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता नुकताच पंतप्रधान मोदींच्या हस्ते वितरित करण्यात आला यावेळी मावळ मधील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला मावळ तालुक्यात ठाकरवाडी शिंदे वस्ती सोमाटणे इथल्या वनहद्दीतील आदिवासी कुटुंबांना जमीन देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे पाच पिढ्यांपासून राहणाऱ्या
कुटुंबांना कायदेशीर हक्क मिळणार आहे. मावळचे आमदार सुनील शेळकेनी याकरता पाठपुरावा केला. लोणावळी येथील मुख्य बाजारपेठेतील बॅरिकेड्स मुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो तक्रार करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याचा आरोप करण्यात आलाय. यामुळे व्यापाऱ्यांनी उद्या बाजारपेठ बंद करण्याचा इशारा दिलाय. दरम्यान तातळीन बॅरिकेड सटवण्याची मागणी होती आहे. जळगावात गेल्या महिन्याभरात भटक्या कुत्र्यांनी तब्बल 579 नागरिकांचे लचके तोडलेत. रात्री अपरात्री नागरिकांवर हल्ले करण्याच प्रमाण वाढलेल आहे मात्र पालिका प्रशासनाकडून कुत्र्यांवर कोणतीही कारवाई
केली जात नाही नागरिक संतप्त आहेत सिंधुदुर्ग मध्ये एक ऑगस्ट पासून सागरी मासेमारीला सुरुवात झाली निवती बंदर या ठिकाणी सकाळी सात वाजता माशांचा लिलाव सुरू झाला त्यामुळे ऐन श्रावणात निवती किनारी खवैयांची मोठी गर्दी झाली. विद्यार्थ्यांना बालपणापासून देशभक्तीसह शेतकऱ्यांविषयी आणि सैनिकांविषयी सुद्धा आदर वाटावा याकरता नवा उपक्रम राबवण्यात येतोय. येत्या 15 ऑगस्ट पासून देशभक्तीचे धडे विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत अशी माहिती दिली शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी. मसाळा शहरात मोकाट कुत्रे गाई गुर जनावर
यानंतर आता घोड्यांच्या वावरामुळे सुद्धा शहरातील वाहनचालक आणि पादचारी त्रस्त झालेत. सध्या पावसाळा सुरू आहे घोडे मालकांच्या हातात काम नाहीये त्यामुळे घोडे मालकांनी आपल्या ताब्यातील घोड्यांना मोकाट सोडलय मोकाट घोड्यांमुळे अपघाताचा धोका वाढलेला आहे. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील बैसखेडा या शेतशी शिवारात काम करत असताना अचानक विजेची तार अंगावर पडल्याने शेतकऱ्यासह त्याच्या दोन बैलांचा जागीच मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते. बुलढाण्याच्या खामगाव इथे जिल्हास्तरीय राणभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला
यावेळी महोत्सवाला कामगार मंत्री आकाश फोनकर यांनी भेट दिली त्यांनी विविध प्रकारच्या राणभाज्यांबद्दल माहिती घेतली. मिरज मधील सम्राट श्री दत्त मंदिर गणेशोत्सव मंडळाच्या तब्बल 18 फुटी गणेश मूर्तीच मोठ्या थाटामटात आगमन झालं हजारोंच्या संख्येने गणेश भक्तांनी मुखदर्शन सोहळ्याला गर्दी केली. मुक्ताई नगर मधील विद्यार्थिनींनी भारतीय सीमेवरील सैनिकांना राखी पाठवली आहे. भारतीय सीमेवर तैनात असलेल्या जवानांना राखी पाठवून विद्यार्थिनींनी सैनिकांपती असलेल प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली. वाशिम जिल्ह्यात आमदार भावना गवळींकडून
त्यांच्या मतदारसंघात तीन लाख राख्या पाठवल्या जाणार आहेत. याकरता लगभग सुरू करण्यात आली आहे गेल्या 24 तासां 24 गेल्या 27 वर्षांपासून आमदार गवळी त्यांच्या मतदारसंघात राख्या पाठवत आहेत
Click here to Connect with us through Telegram Channel
Todays News Highlights | aajchya Tajya ghdamodi | marathi batmya | mharashtra Batmya
आजच्या ताज्या घडामोडी | मराठी बातम्या | महाराष्ट्र बातम्या | सरकारी बातम्या